चिपळूण शहरातील नारायण तलाव परिसरात मॉर्निंगवॉक वेळी कानी पडणार भक्तीगीतांचे सूर
चिपळूण शहरातील नारायण तलाव परिसरात मॉर्निंगवॉक करताना भक्तीगीतांचे सूर कानी पडणार आहेत. त्यासाठी नगर परिषदेने येथे १७ स्पिकर्स लावले आहेत. सौरउर्जेचा वापर करण्याचा संदेश देण्यासाठी परिसरात १७ सौरदिवेही लावण्यात आले आहेत. बच्चे कंपनीला आनंद लुटता यावा यासाठी खेळणी बसवण्यात आली असून नागरिकांना बसण्यासाठी खास कट्टे साकारण्यात आले आहेत. अशा विविध सोयींमुळे बगीच्या मन प्रसन्न करणार असल्याने नागरिकांना आता या तलावाच्या उदघाटनाची उत्सुकता लागली आहे.अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या शहरातील नारायण तलावाला नगर परिषद सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून नवसंजीवनी देत आहे. यासाठी अनेक संस्थांनी पाठपुरावा केला होता.www.konkantoday.com