कोकण एक्सप्रेस मार्गाला काळबादेवी गावात विरोध,पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना माेजणीथांबविण्याचे दिले आदेश
मुंबई-गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘कोकण एक्स्प्रेस’ हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महामार्गासाठीरत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी भूसंपादनाच्या माेजणीचे काम ग्रामस्थांनी राेखले.ग्रामस्थांनी या माेजणीला विराेध केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.’काेकण एक्स्प्रेस’ हा एकूण २२ गावातून जाणार असून, यामुळे मुंबई ते गोवा प्रवास ६ तासात पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प हाती घेतला आहे. कोकणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण ३६३ किलाेमीटर लांबीचा असणार असून, सहा मार्गिकांचा आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत जाणारआहे.या महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून, या मार्गावरील विविध गावांतून भूसंपादन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी माेजणीसाठी अधिकारी दाखल झाले आहेत. सर्व शासकीय यंत्रणा गावात दाखल होताच येथील ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध केला. त्यामुळे या भागात वातावरण तणावपूर्ण बनले हाेते. प्रकाराबाबत शिंदेसेनेचे शाखाप्रमुख संदेश बनप यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील यांच्याशी संपर्क साधत भूसंपादन माेजणीची त्यांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार अमरावती दौऱ्यावर असणारे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर टाकण्यात आला. मंत्री सामंत यांनी तत्काळ ही मोजणी थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली.