
वेरळ समर्थ विश्व येथील विविध इमारतीतील बंद पाच सदनिका व दोन रो हाऊस बंगलो चोरट्याच्या टोळीने फोडले
_मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ समर्थ विश्व येथील विविध इमारतीतील बंद पाच सदनिका व दोन रो हाऊस बंगलो चोरट्याच्या टोळीने फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना गुरूवारी (ता. ४) सकाळच्या सुमारास उघड झाली. यामुळे येथील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून थंडावलेले चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. चोरट्यांनी वेरळ येथील समर्थ विश्व येथील इमारतींना आपले लक्ष्य केले. अज्ञात चोरट्यानी बंद असलेल्या पाच सदनिका व दोन रो हाऊसेस (बंगले) फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची शक्यता वर्तवली आहे. वेरळ येथील समर्थ हा परिसर अत्यंत गजबजलेला असून, चोरट्यांनी या परिसराला नेमके कसे लक्ष्य केले याबाबत पोलिसदेखील चक्रावले आहेत. दरम्यान, चोरीच्या घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले आहेत