
अजिंठा लेणीत मधमाश्यांनी चढविला पर्यटकांवर हल्ला
अजिंठा लेणीत पुन्हा एकदा मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. जवळपास १० ते १२ पर्यटकांना मधमाश्यांनी डंख मारला. गेल्या १५ दिवसांपासून वेरुळ आणि अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत.या दोन्ही जागतिक वारसा स्थळांच्या परिसरात जागोजागी मधमाश्यांचे पोळे आहे.
हे पोळे हटविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मधमाश्यांकडून हल्ले सुरूच आहेत. अजिंठा लेणीतील ताज्या घटनेवेळी पर्यटकांनी रुमाल, स्कार्फ चेहऱ्यावर झाकून बचाव करण्याचा प्रयत्न केला. अशातही मधमाश्यांनी डंख मारला. लेणीत बसून अनेकांनी स्वत:च्या शरीरावरील मधमाश्यांचे काटे काढले.