आमदार मिलिंद नार्वेकर यांची सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभेसाठीच्या नियोजनाबाबत पदाधिकार्‍यांशी बंद दाराआड चर्चा

गाफील राहू नका वैभवला निवडून आणायचे आहे हे लक्षात ठेवा, असा सल्ला ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना कुडाळच्या बैठकीत दिल्याची माहिती मिळतेय.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभेसाठीच्या नियोजनाबाबत पदाधिकार्‍यांशी बंद दाराआड चर्चा केली.शिवसेना सचिव तथा आ.मिलिंद नार्वेकर यांनी सुरुवातीला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांशी झाराप येथील हॉटेल आराध्या येथे बंद दाराआड चर्चा करण्यात आली. यावेळी सावंतवाडी मतदार संघातील कणकवली जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, बाळा गावडे, रूपेश राऊळ आदिसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button