
अश्लिल व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देवून वृद्धाला साडेपाच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा
वॉटसऍपवर अश्लिल व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून राजापूर तालुक्यातील ओणी गुरववाडी येथील नरेंद्र नावाच्या ७४ वर्षाच्या वृद्धाकडून साडेपाच लाख रुपये खात्यात ट्रान्सफर करायला लावून त्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्रिया शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा (पूर्ण पत्ता माहित नाही) या तिघाजणांविरूद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील ओणी येथील राहणारे नरेंद्र (७४) यांचा शेती व्यवसाय असून यातील आरोपी १, २ व ३ यांनी एकमेकांच्या संगनमताने वॉटसऍपवर अश्लिल व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तो व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर त्यांनी ऑनलाईन पैसे भरावेत अशी मागणी केली. त्यांच्या धमकीला घाबरून फिर्यादी यांनी बँक ऑफ इंडियाच्या ओणी शाखेतून आरोपींच्या खात्यात ८.५.२०२४ पासून २०.५.२०२४ पर्यंत असे वेगवेगळ्या रक्कमा मिळून ५ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी राजापूर पोलीस स्थानकात वरील आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com