
सुकिवली कर्टेलरच्या हद्दीत मोरांची शिकार करण्याचे प्रमाण वाढले
खेड तालुक्यातील सुकिवली कर्टेलरच्या हद्दीत मोरांची शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्य गावातील शिकारी या मार्गावर येवून मोराची शिकार करत पलायन करत असल्याची बाब समोर आली आहे. कर्टेल येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर केलेल्या शिकारीसह शिकारी धूम ठोकत आहेत. ग्रामस्थांनी वनविभागाच्या निदर्शनास ही बाब आणूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शिकार्यांचे फावत असल्याचा सूर आवळला जात आहे. वनविभागाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास शिकार्यांचा आम्हालाच बंदोबस्त करावा लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.सुकिवली-कर्टेल मार्गावर मोरांचा वावर सुरू असल्याची बाब हेरत अन्य गावातील शिकारी त्या ठिकाणी शिकारीसाठी येत आहेत. मोराची शिकार करण्यासाठी दुचाकीसह मारूती व्हॅनचा वापर केला जात असल्याची बाब समोर आली आहे. www.konkantoday.com