
*संगमेश्वर-चिपळूण आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात भाजपचाच उमेदवार उभा राहील भाजपा माजी आमदार बाळ माने यांच्या दाव्याने खळबळ
संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच जोमाने तयारीला लागा, असे आवाहन भाजप माजी आमदार बाळ माने यांनी केले.संगमेश्वर येथील स्वाद कार्यालयात आयोजित भाजप संगमेश्वर उत्तर मंडळ कार्यकारणी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, सदस्या दीपिका जोशी, ज्येष्ठ कार्यकर्त्या माधवी भिडे, चंद्रशेखर निमकर आदी उपस्थित होते. ते म्हणाले, भाजप कार्यकर्त्याने कोणतेही भावनिक राजकारण न करता वास्तव्याचे राजकारण करावे. कोणत्याही प्रकारची शंका-कुशंका न बाळगता कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या पूर्वतयारीला लागून पक्ष वाढीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संगमेश्वर-चिपळूण आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात भाजपचाच उमेदवार उभा राहील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागावे. संगमेश्वर तालुक्यातील आमदार कोण आहेत, हे भारतीय जनता पार्टी ठरवेल. जनता ही राजा असते. नळ पाणी योजनेची विविध कामे प्रतीक्षेत आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्याने जाऊन कामकाज कसे चालू आहे, हे पाहावे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.