
लांजा जवळ भरधाव वेगाने चिरा वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ब्रिजवर जावून धडकल्याने ट्रक चालकासह क्लिनर असा दोघांचा जागीच मृत्यू
* लांजा जवळ भरधाव वेगाने चिरा वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ब्रिजवर जावून धडकल्याने या अपघातात ट्रक चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे (१७ वर्षे, दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा-दाभोळे मार्गावर तळवडे गावातील कोकण रेल्वे ब्रिज जवळ घडला आहे. याबाबतची माहिती तळवडे पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक कमलाकर भागप्पा केंगार (२८ वर्षे, रा. असांगी तुर्क, पांडोझरी, ता. जत जि. सांगली) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक (केए – २८ डी ५३१२) चिरा घेवून चालला होता. लांजा ते दाभोळे मार्गावर तळवडे गाव हद्दीतील कोकण रेल्वे ब्रिजवर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालक कमलाकर केंगार याने ट्रक चालवून रेल्वे ब्रिजवर धडकविला. या अपघातात चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे (१७ वर्षे, रा. जदर, बोबलाड, ता. जत जि. सांगली) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला.