यंदाच्या पावसाळ्यात कशेडी घाटातील राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला
मुंबई- गोवा महामार्ग क्रमांक ६६ महामार्गावरील कशेडी बंगला येथे रायगड, रत्नागिरी सीमावर्ती भागामध्ये तसेच जवळच्याच युटर्नवरील वळणरस्त्यावर रत्नागिरी हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहन चालकांना खड्डेच खड्डे, असा अनुभव घेताना गेला रस्ता कुणीकडे, असा प्रश्न पडल्याचे दिसून येत आहे.कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून छोट्या वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र आजही अनेक अवजड वाहनांसह एसटी बस व इतर वाहने कशेडी बंगला मार्गे कोकणात व मुंबईकडे ये-जा करीत असल्याने गणेशोत्सवापूर्वी घाटरस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २००९ सालापासून रखडलेले आहे. यंदाच्या पावसाळ्यात कशेडी घाटातील राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला असून संततधार पडणार्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे वाढत आहेत. यामुळे वाहने नादुरूस्त होवून अनेकदा वाहतूक कोंडीचा त्रास प्रवासी जनतेला सहन करावा लागत आहे. www.konkantoday.com