मांडवी किनाऱ्यावर येऊन पर्यटकांनी काय बघायचे कचरा? किनारे स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन!
कोकणच्या सौंदर्याचे वर्णन करण्यात कोणी मागे हटत नाही कारण निसर्गाने कोकणला भरभरून साथ दिली आहे मात्र निसर्गाने दिलेले हे सौंदर्य टिकवायचे हे मानवाच्या हातात आहेत रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी व शहरवासीयांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे मात्र सध्या या किनाऱ्याची अवस्था पाहिली तर या ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य पाहायला यायचे की कचरा बघायला यायचे अशी अवस्था झाली आहे मांडवी किनाऱ्यावर नेहमी पर्यटकांची व नागरिकांची वर्दळ असते मात्र या किनाऱ्याच्या अशा अवस्थेमुळे किनाऱ्याचीच बदनामी होत आहे मांडवी किनाऱ्यावर पर्यटक व नागरिक आले तर त्याच्या अनुषंगाने येथील छोट्या मोठ्यांचे व्यवसाय चालत असतात निसर्गाने इतर कोणाला दिले नाहीत असे समुद्रकिनारे आपणा कोकणात दिले आहेत एकीकडे आपण पर्यटकांना आकर्षित करण्याचे ठरवतो मात्र अशा ठिकाणी पर्यटक फिरकेल का याचाही विचार करणे गरजेचे आहे स्वच्छता अभियानाच्या योजना आल्या की फोटो पुरते प्रशासनाकडून किनारे स्वच्छतेचे उपक्रम राबवले जातात मात्र त्यानंतर त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही त्यामुळे किनारे स्वच्छतेचा विषय प्रशासनाने गंभीर घेणे आवश्यक आहे गोव्यासारख्या ठिकाणी समुद्रकिनारे स्वच्छ राहू शकतात मात्र आपणाकडे का राहू शकत नाही याचाही विचार करणे गरजेचे आहेत समुद्रात कचरा टाकला तो किनाऱ्यावर येणारच त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करता येईल का हे पाहण्या बरोबरच आलेला कचरा तात्काळ उचलण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे गरजेचे आहे एकीकडे पर्यटनासाठी आपण मोठा निधी खर्च केल्याचे सांगतो मात्र किनारे स्वच्छता करण्यासाठी आपण यंत्रसामग्री आणू शकत नाही हे दुर्दैव आहे रायगड मध्ये अलिबाग व अन्य ठिकाणी किनारे स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा आणण्यात आली आहे तशीच यंत्रणा रत्नागिरी सारख्या ठिकाणी आणणे गरजेचे आहे जेणेकरून शहराजवळचे मांडवी भाटेसारखे समुद्रकिनारी कायम स्वच्छ राहतील व त्याची जबाबदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे प्रशासनाने उपक्रम राबवले तर नागरिक नेहमीच सहकार्य करतात मात्र सगळेच नागरिकांवर सोपवून प्रशासन डोळे झाक करत असेल ते योग्य नाही सध्या मांडवी किनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्याबाबत तेथील पर्यटन व्यवसायात काम करणारे सुहास ठाकूर देसाई व त्यांचे सहकारी आदींनी वेगवेगळे उपक्रम राबवून हा किनारा स्वच्छ करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला आहे परंतु शेवटी त्यांनाही मर्यादा येत आहेत सध्या या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा पडला आहे हा कचरा प्रशासनाकडून स्वच्छ केला जात नसल्याने शेवटी सुहास ठाकूर देसाई यांनी आपल्या हॉटेलचा स्टाफ मदतीला घेऊन हा कचरा साफ करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचे असे प्रयत्न पुरेशे ठरणार नाहीत त्यामुळे अशा कचऱ्याच्या समस्येवर ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करणे गरजेचे आहे अन्यथा पर्यटकांना अशा अस्वच्छ किनाऱ्याचे आकर्षण राहणार नाही सध्या सोशल मीडियामुळे जशी चांगली प्रसिद्ध मिळू शकते तशी वाईट प्रसिद्धीही होऊ शकते याचा विचार गांभीर्याने सर्वांनीच करणे गरजेचे आहे