महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालायकडून राजशिष्टाचार विभागाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.नीलम गोऱ्हे यांना 2 ऑगस्ट 2024 च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये नीलम गोऱ्हे या पहिल्या शिवसेनेच्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.