बेंगळुरूमधील हेब्बल फ्लायओव्हरवर बीएमटीसीच्या व्होल्वो बसने अनेक वाहनांना दिली धडक, पहा व्हिडिओ

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. बेंगळुरूमधील हेब्बल फ्लायओव्हरवर बीएमटीसीच्या व्होल्वो बसने अनेक वाहनांना धडक दिली. अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडकली आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. तसेच घटना घडताच बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फ्लायओव्हरवर जाम असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button