देवूड येथील कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक घोषित अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव मंजूर
सांस्कृतिक संदर्भ म्हणून लाभलेल्या कातळशिल्पांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील देवूड येथील कातळशिल्प समूह हा देखील मध्यश्मयुगीन काळातील आहे. हे कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.देवूड येथील हा कातळशिल्प समूहात एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरीण व पावलांचे ठसे दाखवण्यात आले आहेत. हा समूह मध्याश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले आहे.कोकणातील प्रागैतिहासिक व विशेषत्वाने मध्यश्मयुगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणून या कातळशिल्पांना अनन्यसाधारण महत्व आहे. हे शिल्प असलेले क्षेत्र प्रसाद शिंकर आपटे व इतरांच्या मालकीचे आहे. हे कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्ताव होता. त्याबाबत प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तेथील १००.०० चौ. मी. क्षेत्र संरक्षित केले जाणार आहे. त्या सभोवतालचे एकूण क्षेत्र २१०.०० चौ. मी. आहे. त्यामुळे एकूण ३१० चौ. मी. क्षेत्र संरक्षित होणार आहे. तसे शासनाने निर्देश दिले आहेत. शासकीय मुद्राणलयाला यासंदर्भात नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.www.konkantoday.com