हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी शरद पवार यांची करतो.. दादा भुसे यांची संजय राऊत यांच्यावर टीका‘
लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण महाराष्ट्राने स्वागत केले. अशा शुभ कामात काही अशुभ लोक नावं ठेवतात, अशी टीका दादा भुसे यांनी संजय राऊतांचे नाव न घेता केली. माध्यमं ही राऊतांना जास्त महत्व देतात. हा भोंगा सकाळी सकाळी जनतेची दिशाभूल करतो. हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी शरद पवार यांची करतो. त्यामुळे त्याच्या पोटात दुःख व मळमळ आहे.त्यांच्या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही ‘ असा इशाराही भुसे यांनी दिला.