श्रीमंत, एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाच्या किंमत कळणार नाही-मनोज जरांगे पाटील
मराठा आंदोलकांच्या विरोधाला राज ठाकरे यांना सामोरे जावे लागत आहे. राज ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये आरक्षणा विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. 2006 पासून आपली भूमिका ही आर्थिक निकषावर आरक्षण असावे, असे राज ठाकरे म्हणाले.ठाकरेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.’आरक्षणाची गरज त्यांना नाही पण इतरांना आहे. गोरगरीबांना गरज आहे. श्रीमंत, एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाच्या किंमत कळणार नाही. तुमचे विचार लोकांवर लादू नका.’, असे मनोज जरांगे पाटील राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.राज ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रश्न मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाचे कोठेही आंदोलन सुरू नाही. राज्य शांत आहे आणि शांतच राहणार आहे. महाराष्ट्राला सांगतोय आपल्या मराठ्यांचे आंदोलन सुरू नाही. जे बोलतोय ते स्पष्ट बोलतोय.मनोज जरांगे पाटील यांची दाढी ही मोहम्मद अली जीना यांची दाढी आहे. ते शिवरायांच्या मावळ्याची दाढी नाही, अशी टीका नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली होती. या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, ते त्यांचे शब्द नाहीत. ते देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. ते फडणवीस साहेबांच्या चपला वाहायला लागलेत.मर्द दाढी ठेवतात. हे त्यांना कळणार नाही.