
प्रभाकर आरेकर यांना भंडारी भूषण पुरस्कार
गुहागर तालुका भंडारी समाज यांच्यावतीने बँकींग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांना लोकनेते स्व. सदानंद गोविंद आरेकर यांच्या स्मरणार्थ प्रथमच देण्यात आलेल्या गुहागर तालुका भंडारी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल श्री. आरेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.गुहागर तालुका भंडारी समाज यांच्यावतीने कीर्तनवाडी येथील भंडारी भवन येथे विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. आरेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.www.konkantoday.com