
पालकमंत्री ना. उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण उर्फ भय्या सामंत यांच्या प्रयत्नातून चाफे जाकादेवी या भागातून गोगटे कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र एस टी बस सेवा सुरू विल्ये सरपंच स्वप्नील देसाई यांच्या पाठपुराव्याला यश
रत्नगिरी तालुक्यातील चाफे-जाकादेवी दशक्रोशी येथील विद्यार्थी शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथे ये-जा करीत असून त्यांच्या महाविद्यालयाची वेळ सकाळी ७.०० वा. असून जयगड येथून सकाळी ६.०० वाजता सुटणारी गाडी रत्नागिरी येथे सकाळी ७.३० ला पोहचते. तसेच सदर गाडीला जवळपास ६० ते ७० विद्यार्थी चाफे, जाकादेवी, तरवळ, करबुडे येथून प्रवास करतात. सदर विद्यार्थ्यांना गाडीमध्ये जागा उपलब्ध होत नाही. परिणामी विद्यालयात वेळेत पोहचणे शक्य होत नाही. तसेच प्रॅक्टिकल देखिल देणे शक्य होत नाही. उशिरा येण्याचे कारण दिले तर शिक्षक ऐकून घेत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या अनुषंगाने या भागातील विल्ये ग्रामपंचायत सरपंच स्वप्नील देसाई यांनी पालकमंत्री *ना. उदय सामंत* आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण उर्फ भय्या सामंत* यांच्याकडे पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा केला. सदर विद्यार्थ्यांची ही समस्या सोडवण्यासाठी चाफे-जाकादेवी येथून सकाळी ६.०० वाजता स्वतंत्र बस सेवा सुरु करावी अशी मागणी स्वप्नील देसाई यांनी केली. पालकमंत्री ना. उदय सामंत आणि किरण उर्फ भय्या सामंत यांनी देखील संबंधित एस टी विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करून स्वतंत्र एस टी गाडी सुरू करावी अशा सूचना दिल्या. आता चाफे- जाकादेवी ते गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी अशी स्वतंत्र बस सेवा सुरू झाली असून यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही. या बस सेवेचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ सचिन सुधाकर देसाई, जयेश सुर्वे, महेश साळवी, अमेय विजय देसाई, प्रसाद गजानन देसाई, गणेश वारंगे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.