रत्नागिरी जिल्ह्यात 101 नवे पॉझिटिव्ह, एकूण पॉझिटिव्ह 2391,बरे झालेले 1597

रत्नागिरी दि. 11 (जिमाका): काल सायंकाळपासून 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2391  झाली आहे.  आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, संगमेश्वर 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2,   कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे चिपळूण 14, कोव्हीड केअर सेंटर रीम्झ हॉटेल 1 अशा 26 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.    होम आयसोलेशन मध्ये असलेले 03 रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1597  झाली आहे.
           
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
रत्नागिरी – 46
दापोली-08
कळंबणी-06
कामथे-27
अँटीजेन-14
 
            आज प्राप्त झालेल्य माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खेड तालुक्यातील  पुरेखुर्द येथील 49 वर्षीय जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मृत्यु झाला.  चाकाळे ता.खेड येथील 66 वर्षाच्या रुग्णांचा रत्नागिरी येथे दाखल करण्यास आणत असताना प्रवासादरम्याने मृत्यू झाला.  हर्णे ता. दापोली येथील 70 वर्षीय रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.   त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 83 झाली आहे.
 
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2391
बरे झालेले  – 1597
मृत्यू  – 83
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 711
           
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button