त्यामुळे आदित्य एकतर तू रहा किंवा मी राहिल असं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणाले असावेत- दीपक केसरकर

अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलायं.दरम्यान, ठाण्यात आयोजित सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आज केसरकर यांनी पलटवार केलायं. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते.दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाची मते घेतली आहेत. आता वक्फ बोर्डाचा ठराव आला की सगळे पळून गेले आहेत. ते सर्वजण ठाकरे यांनाच शोधत आहेत. कारण हिंदूंनी ठाकरेंना मते दिलेली नाहीत, या समाजाने दिली आहेत त्यामुळे उत्तर मागण्यासाठी ते लोकं शोधत असून पाण्यात त्यांना तेच दिसत असल्याची टीका दीपक केसरकर यांनी केलीयं.यावेळी बोलताना केसरकरांनी ठाकरे यांच्या वक्तव्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. उद्धव ठाकरेंनी एकतर तू राहशील किंवा मी असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री आपलाच राहिला पाहिजे असं उद्धव ठाकरेंचं आहे. त्यामुळे आदित्य एकतर तू रहा किंवा मी राहिल असं ते आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणाले असावेत, अशा शेलक्या शब्दांत केसरांनी प्रत्युत्तर दिलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button