जेव्हा तुम्हाला मते दिली तेव्हा भाडोत्री, सुपारीबाज दिसलो नाही का?, मुस्लीम आंदोलकांचा संजय राऊतांवर पलटवार , मुस्लिम नेत्यांचा उद्धव ठाकरे सोबत चा फोटो दाखविला
_जेव्हा तुम्हाला मते दिली तेव्हा भाडोत्री, सुपारीबाज दिसलो नाही का?, मत घेतल्यानंतर तुम्हाला दाढी टोपीवाला माणूस असा दिसतोय. आज आम्ही ज्या मतदारसंघात आहोत तो भाग एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात येतो.विद्यमान मुख्यमंत्री आणि खासदार यांच्या विरोधात जाऊन आम्ही इथून राजन विचारेंना मतदान केले. आज जे ते शब्द वापरतायेत, लोकांना केवळ वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आलंय त्यावर यांनी विरोध करावा हीच अपेक्षा होती. आम्ही तुम्हाला मतदान दिले. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा होती. तुम्ही सभागृहातून बाहेर पडला. तुमची भूमिका काय हे तरी सांगा असं सांगत मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लीम आंदोलकांनी संजय राऊतांवर पलटवार केला. मुस्लीम आंदोलक म्हणाले की, ९ खासदारांनी संसदेतून विधेयकाच्या चर्चेवेळी बाहेर गेले. त्यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी तुम्ही मुस्लिमांवर आरोप लावताय. राजन विचारे यांच्या प्रचारात आमची माणसे होती. फैजान शेखचं फेसबुक बघा. या भागातून राजन विचारेंना ४९९ मते पडली. नरेश म्हस्केंना १०३ मते पडली. ही मते मुस्लिमांनी दिली. तुम्ही आज मुस्लिमांना दलाल बोलताय. उद्धव ठाकरेंसोबत आमचे फोटो आहेत, राजन विचारे यांच्यासोबत माझे फोटो आहेत. संजय राऊतांचे काम केवळ माध्यमांत येणं आणि बोलणं इतकेच आहे. त्यापेक्षा मुस्लिमांसाठी काम करा. आम्ही ठाण्याचे असलो, फोटो शिंदेसोबत दाखवून हा तर्क होत नाही. आज फैजान शेख ज्याने या लोकांना निवडून आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आज तोही याविरोधात आहे. जर विधेयकावर स्पष्ट भूमिका घेतली नाही तर उद्या महाराष्ट्र विरोधात जाईल. यात राजकीय हेतू दाखवणं, फोटो दाखवणेहा बालिशपणा आहे. संजय राऊत यांनी गंभीरपणे भाष्य करावे. जर आम्हाला बोलावलं तर आम्ही जरुर चर्चेला येऊ असं त्यांनी सांगितले. तसेच मुस्लीस समाजानं मोठ्या संख्येने शिवसेनेला मतदान केले. हे त्यांनाही माहिती आहे आणि राज्याला, देशालाही माहिती आहे. आज भाजपाला बहुमत मिळालं नाही. ते यूपीत हाफ झाले आणि साऊथला साफ झालेत. त्यामुळे त्यांनी मुस्लिमांना मिरची लावण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं. वक्फ काय हे देशातील जनतेला कळायला हवं.