चिपळूण शहरातील पाचशे भटक्या कुत्र्यांची होणार नसबंदी
चिपळूण शहरातील वडनाका येथील एका बालिकेवर चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल येथील नगर पालिका प्रशासनाने घेतली आहे. प्रशासनाने या श्वानांपासून होणार्या त्रासावर उपाययोजना म्हणून शहरातील पाचशे भटक्या श्वानांची नसबंदी व लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च यासाठी केला जाणार आहे. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांसह उनाड गुरे व गाढवांची संख्याही वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. www.konkantoday.com