
उबाठा गटाच्या शिवसेनेला कोतेवडे जिल्हा परिषद गटात खिंडार कोतवडे जिल्हा परिषद गटातील निवेंडी वरची नेवरेकरवाडीच्या ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
रत्नागिरी (१२ ऑगस्ट २०२४) रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे जिल्हा परिषद गटातील निवेंडी नेवरेकरवाडी येथील ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. गेली अनेक वर्ष गावाच्या आणि वाडीच्या विकास थांबला होता. गावाचा विकास आणि वाढीच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमत करून पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कोतवडे जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोटी रुपयांचा विकास झाला. तसाच विकास यापुढे निवेंडी गावात होईल अशी अपेक्षाही या ग्रामस्थांनी व्यक्त केली.या प्रवेशासाठी विभाग प्रमुख तारक मयेकर यांनी महत्व पूर्ण योगदान दिले. या प्रवेश करता मध्ये वाडीचे अध्यक्ष जितेंद्र रमेश नेवरेकर, महेंद्र शीतप,नितीन पाटील, नितीन चव्हाण, संजय चव्हाण, कृष्णा चव्हाण, दिनेश नेवरेकर, रघुनाथ मनवे, धनंजय नेवरेकर, अरुण नेवरेकर,अरविंद नेवरेकर, राजेंद्र चव्हाण, बालकृष्ण नेवरेकर,प्रवीण नेवरेकर, प्रल्हाद नेवरेकर, राज चव्हाण, रमेश चव्हाण, नेत्रा पाटील,स्वाती पाटील,दिनेश पाटील(सेक्रेटरी), उपसरपंच मेघा शिपत,ज्येष्ठ शिवसैनिक बंडू कुलकर्णी, शाखा प्रमुख प्रकाश कदम लोकांसोबत शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत पालकमंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.