
रत्नागिरीच्या श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर विनोदी कलाकार पिंट्या चव्हाण यांची धमाल करमणूक
रत्नागिरी प्रतिनिधी*: येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर दिनांक 10 ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील विनोदी कलाकार श्री. राजेश उर्फ पिंट्या चव्हाण यांनी समाजात वावरताना सहजपणे घडणाऱ्या विनोदी तसेच अलीकडे मोबाईलच्या जमान्यात एस एम एस द्वारे घडणाऱ्या घटना खास विनोदी शैलीत सादर करून ज्येष्ठ नागरिकांची धमाल करमणूक केली.कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार साळवी उपस्थित होते. ज्येष्ठानी उर्वरित आयुष्यात आनंदी जीवन कसे जगावे, याविषयी श्री. नंदकुमार साळवी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. प्रसिद्ध उद्योगपती श्री. सुनील शेठ भोंगले यांनी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यासाठी स्टील कपाट यावेळी भेट दिले. कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र शंकरराव कदम यांची महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघावर कोकण विभागातून सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉक्टर दिलीप पाखरे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. विनोदी कलावंत श्री पिंट्या चव्हाण यांनी “तुम भी चले, हम भी चले, चलती रहे जिंदगानी या प्रेरणादायी गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करून ..*जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका,**हे जग जिंकायचे आहे तुम्हाला, हार कधी मानू नका,* *श्रीरामाच्या कृपेने यश तुमच्याजवळ आहे,* *जिंकल्याशिवाय कधी थांबू नका*अशा शब्दात त्यांनी आनंदी जीवनाचा मूलमंत्र दिला. यावेळी मुख्य संयोजक श्री. अण्णा लिमये यांच्या 89 व्या वाढदिवसा बरोबरच ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. सचिव समाज भूषण श्री. सुरेंद्र घुडे, यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले. तर आभार प्रदर्शनात आगामी 21 सप्टेंबर च्या मेळाव्यात तोणदे गावचे हास्य कलाकार श्री. संदीप पावसकर हे विनोदी कार्यक्रम सादर करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी सर्वश्री सुधाकर सावंत, प्रभाकर कासेकर, विनायक हातखंबकर, प्रसाद सावंत देसाई संतोष रेडीज, सुरेंद्र शेटे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.