
मृत मासेप्रकरणी सीईटीपीवर खोडसाळ आरोप- सीईटीपीचे अध्यक्ष डॉ. सतिश वाघ
दाभोळखाडीतील मृत मासेप्रकरणी अखिल दाभोळखाडी संघर्ष समितीने लोटे सीईटीपीवर केलेला आरोप फेटाळत हा खोडसाळ असल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्ध उद्योजक व सीईटीपीचे अध्यक्ष डॉ. सतिश वाघ यांनी दिले आहे.ते पुढे म्हणाले की, मार्च २०१८ पासून लोटे परशुराम पर्यावरण संरक्षण सहकारी सोसायटीचा सीईटीपी प्रकल्प एमआयडीसीकडे हस्तांतरित केल्यानंतर त्यांनी सामुहिक सांडपाणी प्रक्रियेच्या कामासाठी ऍक्वा एनव्हायरी इंजिनिअर्स कंपनीची नेमणूक केली आहे. या प्रकल्पात सभासद उद्योगांकडून येणार्या रासायनिक सांडपाण्याच्या कुपनलिकेवर लॉक ऍण्ड की बसवलेली आहे. तसेच घन कचरा गाळ रोखण्यासाठी स्टेनर बसवलेले आहेत. स्टेनर बसवणारी राज्यातील ही पहिलीच औद्योगिक वसाहत असून याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानद सचिवांनी स्तूती करत राज्यातील सर्व रासायनिक कंपन्यांना स्टेनल बसवणे सक्तीचे केले आहे. रासायनिक उद्योगांकडून येणारे रासायनिक पाणी हे केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार घेतले जाते. www.konkantoday.com