
नऊ महिन्यात जिल्हा राज्य उत्पादन विभागाने केलेल्या कारवाईतून सुमारे ३ कोटी ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
जिल्हा राज्य उत्पादन विभागाने एप्रिल २०२१ ते दि. २६ डिसेंबर २०२१ या कालावधीत केलेल्या कारवाईतून सुमारे ३ कोटी ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री करताना या विभागाने केलेल्या कारवाईत ५८३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमधील सर्व प्रकारची मिळून १३ वाहनेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली.
गोव्याहुन होणार्या बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची २ पथके रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीमेवर कायम तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच एक पथक चिपळूण, लांजासह सर्व जिल्ह्यात ठिकठिकाणी नेहमी गस्त घालत असते. रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध दारू वाहतूक व विक्रीवर ही कारवाई करण्यात आली.
www.konkantoday.com