
आता शिक्षकांना प्रौढ असाक्षरांची नोंदणी करण्याची नवी कामगिरी
प्रौढ असाक्षरांची पहिली परीक्षा आटोपून सव्वाचार लाख लोक साक्षर झाले. आता २०२४२५ या नव्या वर्षासाठी राज्यभरातील शिक्षकांना निरक्षर नोंदणीचे नवे टार्गेट ठरवून देण्यात आले आह. त्यानुसार राज्यातील ५ लाख ७३ हजार ३३७ प्रौढ निरक्षकांची नोंदणी करायची आहे. तसेच जुन्या वर्षातील उर्वरित निरक्षकांसह एकंदर ८ लाख ४ हजार ९९ प्रौढांची यंदा परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता मे महिन्यात गुरूजींनी पहिल्या वर्गाचे विद्यार्थी शोधत असतानाच प्रौढ निरीक्षरांची नोंदणीही सुरू करण्याचे निर्देश योजना शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.www.konkantoday.com