मर्द असाल तर समोर या, दम असेल तर तुम्ही पळून का गेलात? -*राजन विचारे
ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. परंतु या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या समर्थकांनी जोरदार राडा केल्याचं दिसलं.उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकलं. मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील त्यांनी मोठा गोंधळ घातला. यावरून आता ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केलाय. मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात? ठाण्यातील राड्यानंतर राजन विचारे यांनी संतापजनक सवाल विचारला आहे.माध्यमांशी बोलताना राजन विचारे म्हणाले की, आज महिलांना पुढे करून जो प्रकार घडला, तो अतिशय निंदनीय आहे. बीडला झालेल्या घटनेचं समर्थन नव्हतंच, असं देखील त्यांनी म्हटलंय. मर्द असाल तर समोर या, दम असेल तर तुम्ही पळून का गेलात? आज आमचा कार्यक्रम होता म्हणून शांत होतो. उद्धव ठाकरे यांचा इतिहास मोठा आहे. विरोधक प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असल्याची टीका राजन विचारे यांनी केलीय.सभागृहातील दीड दोन हजार पब्लिक खाली आली असती, तर आणखी वेगळा प्रकार घडला असता असा इशारा देखील राजन विचारे यांनी दिला. मुंबईवरून गाडीत बसून, लपून छपून बाईट दिला. अरे काय तुझं, हे करू ते करू अशी भाषा वापरत आहेत. शिवसैनिकाला अशी भाषा वापरू नका, शिवसैनिक कधीही अंगावर यायला तयार असतात, अशी आक्रमक भूमिका देखील राजन विचारे यांनी घेतली आहे. काल ठाण्यातील मेळाव्यात घडलेल्या प्रकारानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे