
फेस कॉम च्या सदस्यपदी रत्नागिरीचे श्री. राजेंद्र शंकरराव कदम यांची निवड
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी केले अभिनंदन*रत्नागिरी प्रतिनिधी : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजेच फेस्कॉमच्या कोकण विभागाची निवडणूक नुकतीच संपन्न होऊन कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र शंकरराव कदम यांची सन 2024 – 27 या कालावधी करिता निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी श्री. मदन मुळे यांनी जाहीर केले आहे. श्री. कदम यांच्या या निवडीबद्दल कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.