
आलिशान सफारी गाडीतून गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक करताना सोलापूर येथील दोघे ताब्यात
आलिशान सफारी गाडीतून गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक करताना सोलापूर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून ८ लाख किंमतीच्या आलिशान कारसह तब्बल ३ लाख ६९ हजार ६०० रुपयांची दारू मिळून एकूण ११ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर कणकवली ओसरगाव टोल नाका येथे ही कारवाई केली.
मुंबई गोवा महामार्गावरून गोवा येथून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याने गेले काही दिवस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या अवैध वाहतुकीवर कारवाई केली जात आहे. सोमवारी दुपारी १२.२० च्या सुमारास एका आलिशान कारची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. याप्रकरणी स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर (वय २५ ) व शहाजी पठाण गायकवाड, वय २१, दोघेही रा. टाकळी सिकंदर, भीमा सहकारी साखर कारखान्याजवळ, ता.मोहोळ जिल्हा-सोलापूर )
यांना ताब्यात घेण्यात आले.
www.konkantoday.com