गोळ्यांच्या अतिसेवनाने तरूणाचा मृत्यू

रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालय येथे उपचार सुरू असलेल्या तरूणाचा गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झााला. ही घटना गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. अनिल तुकाराम कांबळे (४५, रा. साखरपा, संगमेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी पोलिसांत करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल कांबळे यांना मानसिक आजार असल्याने त्यांच्यावर उपप्रादेशिक मनोरूग्णालय येथे उपचार करण्यात येत होते. २ ऑगस्ट रोजी त्यांनी गोळ्यांचे अतिसेवन केल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. अनिल यांच्यावर उपचार सुरू असताना ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button