खेडशी माध्यमिक विद्यालयाला श्यामसुंदर तोडणकर यांची देणगी
रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाला कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक श्री. श्याम सुंदर तोडणकर यांनी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुभाष पाटील यांनी या देणगीचा स्वीकार करून श्री. तोडणकर यांनी शैक्षणिक कार्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी मिरजोळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. राजू तोडणकर आणि कुवारबाव येथील श्रीमती राधाबाई जागुष्टे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. रवींद्र इनामदार हे उपस्थित होते.