
कागदी विमाने उडवणारी शिवानी घेणार विमानातून आकाश भरारी
रत्नागिरी: (जमीर खलफे) रत्नागिरीची पहिली महिला पायलट म्हणून मान मिळवलेली शिवानी नागवेकर आता प्रत्यक्षात कामावर रूजू होणार आहे. तिला शुभेच्छा देण्यासाठी नागवेकर व विलणकर कुटूंबियांनी शनिवारी कौटूंबिक शुभेच्छा समारंभ रत्नागिरी येथे आयोजित केला होता.2022 साली पायलट बनलेली शिवानी नागवेकरला लहानपणापासून विमानाची आवड होती. आपल्या आवडीलाच तिने आपले करियर बनवले व लहानपणी आवडीने कागदी विमाने उडवणारी शिवानी अतिशय खडतर टे्रनिंग पूर्ण करून पायलट बनली. ती पायलट झाली तेव्हा रत्नागिरीकरांनी तिचा नागरी सत्कार केला होता. आता शिवानी प्रोफेशनल पायलट म्हणून चेन्नई येथे विमान कंपनीत रूजू होणार आहे.नोकरीत रूजू होण्यापूर्वी तिच्या कुटूंबियांनी तिचा छोटेखानी शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला नागवेकर व विलणकर कुटूंबातील सदस्य उपस्थित होते. तिच्या भावी कारकिर्दीसाठी सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या.