उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाड संतापले!
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात काल १० ऑगस्ट रोजी मनसे सैनिकांनी गोंधळ घातला. यावेळी अनेक मनसे सैनिकांनी आक्रमक होत उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकलं, नारळ-बांगड्या फोडल्या. याघटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय. त्यानंतर त्यांनी या हल्ल्यावरून पोलिस यंत्रणेवर देखील हल्लाबोल केलाय. याप्रकरणी त्यांनी तीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत संतापजनक सवाल विचारला आहे.*जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?*जितेंद्र आव्हाड यांनी काल उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या भाष्य केलंय. यासंदर्भात त्यांनी तीन व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या व्हिडिओजमधून ठाण्याचे पोलीस कोणत्या मानसिकतेत आहेत, हे स्पष्ट होत आहे. पोलिसांना मी अजिबात दोष देत नाहीये. पण, अधिकाऱ्यांनी कणा असल्यासारखं वागावं. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचं खच्चीकरण होत आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.*उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला*खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या… आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावं, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. अशा प्रकारामुळे महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे जगभर कौतूक केलं जायचं, त्यांच्यावर आता नामुष्की ओढावत आहे. हे कोणाच्याच लक्षात येत नसल्याचं आव्हाडांनी केलंय. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय.*धक्कादायक प्रकार*ठाण्यातील घडलेला प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारा नाही. विरोधी पक्षातील नेत्याचा जीव जर इतका धोक्यात असेल, तर राज्यात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावं असं देखील त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. काहीही बोललं, कोणाची टिंगल टवाळी केली तरी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं; परंतु, तुम्हाला कोणी काय बोलल्यानंतर तुम्ही गाड्या फोडणार. सभा देखील उधळून लावण्याची धमकी देणार. माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेलं नाही, हे लक्षात ठेवा असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.