अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल
उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वागळे इस्टेट येथील विभाग प्रमुख प्रितेश राणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, अविनाश जाधव, प्रितेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलु, मनोज चव्हाण, यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी म्हटले की, ‘तुम्ही आमच्या राज साहेबांच्या ताफ्यावर सुपारी फेकून मारल्या. त्यामुळे आम्ही उत्तर दिले. तुम्ही सुपारी फेकली तर आम्ही नारळ फेकू. यापुढे राज ठाकरे यांच्याविरोधात काही बोलल्यास घरात घुसून मारू, असेही त्यांनी म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे