सरकारने आकस्मित आपले सरकार केंद्राच्या सेवा संपुष्टात आणल्याने राज्यातील २० हजार संगणक परिचालकांवर टांगती तलवार
सरकारने आकस्मित आपले सरकार केंद्राच्या सेवा संपुष्टात आणल्याने तुटपुंज्या मानधनावर या केंद्रामध्ये गेली १२ वर्षे अथक काम करणारे २० हजार संगणक परिचालक यांच्या भविष्यावर टांगती तलवार आली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ८४७ संगणक परिचालकांचा समावेश आहे. करार संपल्याने अद्यापही त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेची मागणी आहे. मात्र सरकारच्या या भूमिकेमुळे ग्रामपंचायतींमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणार्या परिचालकांच्या भविष्याबाबत यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.www.konkantoday.com