लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांच्या शेपट्या ठेचल्याशिवाय राहणार नाही-संजय राऊत


ठाण्याने हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला त्या शिवसेनेचं ठाणं आहे. त्या ठाण्याने उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भगवा सप्ताह सुरू आहे.त्यानिमित्ताने काम सुरू आहे. हा भगवा सप्ताह काल ठाण्यात व्हायला पाहिजे होता. काल नागपंचमी होते. ज्या सापांना या ठाण्यात इतकी वर्ष दूध पाजलं अगदी हिंदुहृदय सम्राट, धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे तुम्ही या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांच्या शेपट्या ठेचल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

आपला भगवा सप्ताह आहे. त्यांचा आम्हाला जगवा सप्ताह आहे. दिल्लीत जातात मोदींना म्हणतात आम्हाला जगवा. सध्या ते सिनेमे फार काढत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की दिग्दर्शक. मलाही एक सिनेमा काढायाचा आहे. नमक हराम टू. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. एक नमक हराम आला होता. अमिताभ आणि राजेश खन्नाचा. मीचांगला लेखक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मी राजकारण घडवतो. बाळासाहेबांनी शिकवलं राजकारण घडवलं पाहिजे, बिघडवलं पाहिजे. तेव्हा मी नमक हराम सिनेमा काढणार आहे. या नमकहरामांची पोलखोल करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button