
राष्ट्रवादी वयोश्रीसाठी पंचायत समितीवर धडक
राज्यातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र या योजनेची माहिती ग्रामपंचायतीकडून ज्येष्ठांना योग्यरित्या मिळत नाही. त्यांना उलट सुलट उत्तरे दिली जातात. त्यासाठी ग्रामपंचायतीने गावातील पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव घेवून ते पंचायत समिती द्यावेत, पंचायत समितीने एकत्रितपणे हे प्रस्ताव समाजकल्याणकडे पाठवावेत, असे केल्यास ज्येष्ठांना रत्नागिरीत हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांनी पंचायत समितीकडे केली आहे. www.konkantoday.com