राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी दौऱ्यावर- पालकमंत्री उदय सामंत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी दौर्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, रत्नागिरी विनातळावरील टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नामकरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्ह्यातील ७० हजारपेक्षा जास्त महिलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव देण्यात येणार आहे. www.konkantoday.com