रत्नागिरीतील खड्डे १५ ऑगस्टपूर्वी भरणार-मुख्याधिकारी
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्याचे काम कंत्राटदारा मार्फत हाती घेण्यात आले आहे. १५ ऑगस्टपर्यंत शहरातील खड्डे भरण्याचे काम पूर्ण काम पूर्ण होईल व चांगले रस्ते नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली. ते म्हणाले, सततचा भरपूर पाऊस यामुळे शहरातील रस्त्यांना खड्डे पडले. आतापर्यंत खूप पाऊस होता. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी होत आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरुन घेण्यासाठी कामकाज सुरु आहे. कंत्राटदाराला हे काम सोपवले आहे.