
बाळासाहेब खेर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी कृतज्ञता दिवस कार्यक्रम
रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे संस्थापक, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व थोर मानवतावादी कै. बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन हा आमच्या संस्थेच्या वतीने कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम आज रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. मोरोपंत जोशी सभागृहात (सर्वोदय छात्रालय) आयोजित केला आहे.या कार्यक्रमात यावर्षीचा”बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार” देऊन एका छात्राला गौरविले जाणार आहे. तसेच अन्य गुणवंत छात्रांनाही शिष्यवृत्या व पारितोषिके देऊन गौरविले जाणार आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा येथील प्रा. डॉ. राहुल मराठे हे समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत.या समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदिप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, ट्रस्टी बाळकृष्ण शेलार आणि श्रीमती सोनवीताई देसाई आणि व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके यांनी केले आहे.