
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी बाजारपेठ नागरिकांनी फुलली
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी रत्नागिरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला होता. परंतु आज गणेशोत्सव प्रतिष्ठापनेच्या आदल्यादिवशी पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी केली. गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठेतील व्यापार्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपली दुकाने उत्सवासाठी लागणार्या निरनिराळ्या वस्तूंनी सज्ज केली होती. परंतु हवामान खात्याने दिलेल्या इशार्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली होती. स्थानिक व्यापार्यांशी संपर्क साधल्यावर व्यापार्यांनी आधी कोरोना व आता पडणार्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन वर्षापेक्षा यंदा कमी व्यवसाय झाल्याचे सांगितले. व यामुळे व्यापारी काही प्रमाणात निराशा असल्याचे दिसून आले.
www.konkantoday.com