मंडणगड तालुक्यातील आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाचा गलथान कारभार सुरूच
मंडणगड तालुक्यातील आंबडवे-लोणंद या गेली सात वर्षे सुरू असलेल्या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. या संदर्भात मंडणगड तालुका संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्राधिकरण व ठेकेदारांनी तालुकावासियांना आश्वासन दिल्यानंतरही गलथान कारभार सुरूच असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी दिली आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामांबाबत व विविध समस्यांबाबत संघर्ष समितीने प्रशासनाकडे निवेदन देवून रस्त्याला पडलेले खड्डे, गटारे, अंतर्गत गावांमध्ये जाणारे रस्ते ही कामे १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन दिली होती.www.konkantoday.com