
दुचाकी- बोलेरो अपघातात दोघे गंभीर जखमी
*मुंबई-राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दुचाकी आणि बोलेरो पिकअप या वाहनांमध्ये अपघात होऊन दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघातातील दोन्ही जखमी तरुण हे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील अमर विश्वास कांबळे आणि संजय साळुंखे हे दोघे तरुण सावर्डे येथील आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आरवली येथे दुचाकी-बोलेरो अपघातात सांगलीतील दोघे गंभीर दुचाकीवरुन (एमएच १० सीटी ९४८२) वरून जात असताना आरवली ता. संगमेश्वर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर एका बोलेरो पिकअपवर आदळले. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातात त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश शेलार, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ खाडे, पोलीस किशोर जोयशी आदी अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले.