जि.प. प्राथमिक शाळांवर पुन्हा ३५२ शिक्षक नियुक्त्या
रत्नागिरी जिल्हा परिषदेला चालूवर्षी शासनाने १ हजार पद भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात ९९७ शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली होती. पण त्यानंतर पुन्हा नव्याने भरतीसाठी ३९७ शिक्षकांना समूपदेशनासाठी गुरूवारी पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी ३५२ जणांना नियुक्त्या देण्यात आल्या असल्याचे जि.प. प्रशासनाकडून सांगण्यात आले. www.konkantoday.com