खवलेमांजराची खवले विक्री प्रकरणी अटक केलेल्या 3 आरोपींव्यतिरिक्त चौथ्या फरारी आरोपीला अटक

विभागिय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळुण) यांना दापोली परिक्षेत्रातील, वनपरिमंडळ खेड मधील नियतक्षेत्र तळे मध्ये दिनांक ३०.०१.२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार मौजे भरणे येथील काळकाई मंदीरजवळ मुंबई गोवा हायवेनजिक एक इसम वन्यप्राणी खवलेमांजराची खवले विक्री करण्यासाठी येणार असल्यांची गुप्त माहीती मिळाल्या नुसार दापोली परिक्षेत्रातील कर्मचारी यांना घेऊन सापळा रचुन संबंधित ०३ संशयीत आरोपींना अटक केली होती. संशयीत आरोपींना अटक करुन वनविभागामार्फत कसुन चौकशी करणेत आली. चौकशी दरम्यान प्रस्तुत गुन्ह्यामध्ये चौथा आरोपी समाविष्ट असल्याची माहीती वनविभाच्या हाती लागली होती. तपासादरम्यान चौथ्या संशयीत आरोपीचा शोध रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच रायगड जिल्ह्यातही सुरुच होता. दिनांक ०९.०८.२०२४ रोजी वनविभागाला मिळालेल्या माहीती नुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना आरोपी श्री. दत्ताराम शामा कोंडकेवय ६४ रा. वाघेरे पैकी कडसरी लिंगाणा संभाजीनगर. ता. महाड जि. रायगड यास त्याचे राहते घरातुन चौकशीसाठी ताब्यात घेतले. दत्ताराम शामा कोंडके वय ६४ यास अटक करुन त्याची अधिक चौकशी करुन आज दिनांक १०.०८.२०२४ रोजी आरोपीला मे. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग-०१, खेड यांचेसमोर हजर केले असता, सदर आरोपींना १२ ऑगस्ट पर्यंत रिमांड कस्टडी मंजूर करणेत आली आहे. दत्ताराम कोंडके हा आरोपी खुप दिवस फरार होता. वनविभागाने त्याला शिताफिने पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button