कुणबी समाजाशिवाय विधानसभा जिंकणे अशक्य, कुणबी सेनेचा राजकीय पक्षांना इशारा

कुणबी समाजाच्या मतांवर निवडून गेलेल्या सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी या समाजाच्या बाजूने एकदाही आवाज उठवला नाही. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील या समाजाच्या प्रश्‍नांची दखल घेतली गेली नाही. अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवून देण्यासाठी कुणबी समाज पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हा समाज आपली ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनानाथ रावणंग, जिल्हासचिव प्रदीप उदेग, तालुकाप्रमुख संजय जाबरे यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button