
उबाठा गटाने सुरुवात केलीय आता शेवट आम्ही करणार, मनसेचा उबाठाला इशारा, आदेश आला तर उद्धव ठाकरे गटाला मातोश्रीच्या बाहेर निघू देणार नाही
* बीडमध्ये राज ठाकरे यांच्या कारसमोर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधानंतर मनसे नेते आक्रमक झालेत. उबाठा गटाने सुरुवात केलीय आता शेवट आम्ही करणार, असा जबर इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलाय.राज ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही उद्धव ठाकरे गटाला मातोश्रीच्या बाहेर निघू देणार नसल्याचा इशाराही दिलाय.विधानसभा निडवणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते बीडमध्ये आहेत. मात्र त्यांचा ताफा बीडमध्ये पोहोचतात राज ठाकरेंना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांची कार थांबवली, त्यामुळे बराचवेळ गोंधळ निर्माण झाला होता.पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवले त्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा पुढे गेला. दरम्यान, जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती. याचदरम्यान राज ठाकरे दाखल झाले. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाल्याचं सांगितलं जात आहे.उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्यानंतर आता मनसे नेत्याकडून प्रतिक्रिया येत आहे. संदीप देशपांडे आणि गजनान काळे यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिलाय. उद्धव ठाकरे गटाने सुरुवात केलीय आता शेवट आम्ही करणार असाच इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.राज ठाकरेंनी आदेश दिल्यावर उद्धव ठाकरे गटाला मातोश्रीच्या बाहेर पण फिरू देणार नाही . आमच्याकडे पान चुना तयार आहे असा इशारा दिलाय. बीडमध्ये उबाठाच्या तिनपाट कार्यकर्त्यांना महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप दिला पाहिजे तो दिलाय. आमच्याकडे पण पान आणि चुना तयार आहे. आदरणीय राज साहेबांनी आदेश दिला तर,या उबाठाला मातोश्रीच्या बाहेर फिरु देणार नाही, अशा इशारा मनसे नेते गजानन काळेंनी दिलाय. व्याजासहीत उबाठाला उत्तर मिळणार, असा इशाराही गजनान काळे यांनी दिलाय. जिनके घर कांच के होते हैं वे दूसरों पर पत्थर नहीं मारा करते. अदानीच्या मोर्चाचं पुढे काय झालं?, असा सवालही त्यांनी ठाकरे गटाला केलाय.




