सुप्रिम कोर्टाची हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालणाऱ्या बंदी निर्णयावर स्थगिती
_मुंबईच्या एका खासगी कॉलेजमध्ये हिजाब बंदीच्या निर्णयावर सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रिम कोर्टानेहिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालणाऱ्या बंदी निर्णयावर स्थगिती दिली आहे.त्याचबरोबर सुप्रि कोर्टाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तरही मागवलं आहे. मुंबईतल्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. याविरोधात नऊ मुलींनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली. मात्र मुंबई हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर या मुलीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारलाय.मुंबईत चेंबूरच्या एनजी आचार्य कॉलेजमध्ये हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. एन जी आचार्य कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. त्यानंतर हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गेटवरच अडविण्यात आलं. कॉलेजनं ठरवून दिलेला युनिफॉर्मच घालावा, अशी माहिती विद्यार्थी आणि पालकांना 1 मे लाच देण्यात आली होती, असं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना अडवण्यात आल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे. तर कॉलेजमध्ये हिजाब आणि ओढणीला परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लीम विद्यार्थी आणि पालकांनी केलीय.