वक्फ बोर्डाच्या 99टक्के जमिनीवर गुंड, बदमाश आणि समाजकंटकांचा कब्जा -मध्य प्रदेशच्या मुस्लीम वक्फ बोर्डाचे चेअरमन सनवर पटेल
लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सार केलं आहे. विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस, समाजवादी पक्षासह इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला.दुसरीकडे मध्य प्रदेशच्या मुस्लीम वक्फ बोर्डाचे चेअरमन सनवर पटेल यांनी या विधेयकाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, मुस्लिम वक्फ बोर्ड विधेयक हे राष्ट्र, जनता आणि वक्फ संस्थेच्या हिताचे आहे. राज्यातील वक्फ बोर्डाच्या 99 टक्के जमिनीवर गुंड, बदमाश आणि समाजकंटकांचा कब्जा आहे असंही त्यांनी स्पष्टच सांगितलं. जेव्हा हे विधेयक मांडण्यात आलं तेव्हा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल म्हणाले की, “मी या विधेयकाचं स्वागत करतो. जी नवी आव्हानं असतात त्यावर योग्य प्रकारे मात करण्यासाठी नवीन कायदे आणि नवीन सुधारणा आवश्यक आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यावेळच्या परिस्थितीनुसार सुधारणा केल्या जातील असं नमूद केलं आहे. ही दुरुस्ती सुधारणेसाठी आहे, त्याचा फायदा जनतेला होतो, मग त्याचे स्वागत का होऊ नये. ही दुरुस्ती राष्ट्रहितासाठी, राष्ट्राच्या लोकांच्याहितासाठी आणि त्या काळातील संस्थेच्या हितासाठी आहे.